मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चुकीच्या कारणास्तव चर्चेत आले. विविध प्लॅटफॉर्मवर त्यांच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, स्वतः Mohan Joshi यांनी पुढे येऊन या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना Mohan Joshi म्हणाले, “नमस्कार! मी मोहन जोशी… माझ्याबद्दल काही चुकीच्या, नकारात्मक बातम्या पसरवल्या जात आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी तब्येतीने उत्तम आहे, अगदी ठणठणीत आहे. मुंबईत निवांत आयुष्याचा आनंद घेत आहे. ३१ ऑगस्ट रोजी पुण्याला जाणार आहे. कृपया कुणीही अशा निराधार बातम्या पसरवू नयेत.” त्यांच्या या निवेदनामुळे चाहत्यांचा संभ्रम दूर झाला असून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
Mohan Joshi हे मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतूनही काम केलं आहे. ‘सवत माझी लाडकी’, ‘तू मी’, ‘घर बाहेर’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘देऊळ बंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’ सारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. तर हिंदीमध्ये ‘गंगाजल’, ‘वास्तव’, ‘इश्क’, ‘हसीना मान जायेगी’, ‘मेजर साब’ आणि ‘गुंडाराज’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी दमदार खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत.
हे पण वाचा.. मी खरंच नशीबवान! Adinath Kothare ने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन; भक्तीत झाला तल्लीन
चित्रपटांव्यतिरिक्त रंगभूमीवरही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष पद भूषवून मराठी नाट्यजगतासाठी योगदान देत आले आहेत.
सध्या अफवांच्या या युगात सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या किती वेगाने पसरतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मात्र, Mohan Joshi यांनी वेळेत प्रतिक्रिया देत स्वतःबद्दल पसरवल्या जाणाऱ्या असत्य अफवांना आळा घातला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे चाहतेही निश्चिंत झाले असून सोशल मीडियावर त्यांना भरभरून शुभेच्छा संदेश मिळत आहेत.
हे पण वाचा.. सुवर्ण स्वप्नांचे जग आणि रुपेरी पडद्याची दुनिया : Priya Bapat च्या ग्लॅमरस फोटोशूटची जोरदार चर्चा









