गणेशोत्सवाचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय. घरोघरी बाप्पा विराजमान झाले असून कलाकारांच्याही घरी हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अशाच लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) यांनी यंदा त्यांच्या घरच्या बाप्पाकडे एक खास मनोकामना व्यक्त केली आहे.
Supriya Pathare यांच्या घरचा बाप्पा यंदा तब्बल १९ वर्षांचा झाला आहे. या प्रवासाच्या आठवणी सांगताना त्यांनी एका मुलाखतीत अनेक किस्से उलगडले. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या सासरी वर्षानुवर्षे बाप्पा विराजमान होत असले तरी त्यांच्या मुलगी जान्हवीने लहानपणी हट्ट धरल्यामुळे त्यांनी स्वतःच्या घरीसुद्धा गणपती आणण्याची सुरुवात केली. “जान्हवीला बाप्पा हवा असायचा. नाही म्हटलं की ती रडायची. म्हणून आम्ही लहानशा मूर्तीपासून सुरुवात केली आणि आज घरात दोन फुटांचा बाप्पा विराजमान होतो,” असं त्यांनी सांगितलं.
यावेळी Supriya Pathare यांनी त्यांच्या मुलाबद्दलही बाप्पाकडे प्रार्थना केली. “आता मुलगा मोठा झालाय. मला घरात एक सून यावी असं वाटतं. मात्र त्याआधी त्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं ही माझी इच्छा आहे. तो सध्या अमेरिकेत असतो. त्याने तिकडे स्थायिक होऊ नये असंही मला वाटतं. नाहीतर इकडचं काही त्याला मिळणार नाही. पण खरं सांगायचं तर, जिथे त्याचं भविष्य उज्वल असेल, तिथे त्याने राहावं आणि बाप्पाने त्याचं आयुष्य आनंदी करावं, एवढंच माझं म्हणणं आहे,” असं त्या हसत-हसत म्हणाल्या.
हे पण वाचा.. “मी लग्न करेन तेव्हा सगळ्यांना सांगेन” – कृष्णराज महाडिकांसोबतच्या फोटोवर Rinku Rajguru ची पहिली प्रतिक्रिया
दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या घरी गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. बाप्पाच्या मूर्तीची उंची जसजशी वर्षागणिक वाढत गेली, तसतसा त्यांच्या घरचा उत्साहही दुणावला आहे. “आता मात्र मी ठरवलंय की दोन फुटांपेक्षा मोठी मूर्ती आणायची नाही, कारण पुढे मुलं परदेशात असतात आणि सगळं आम्हालाच करावं लागतं. पण उत्साह इतका असतो की घरात आनंदाचे वातावरण निर्माण होतं,” असं Supriya Pathare यांनी सांगितलं.
अभिनयक्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या Supriya Pathare यांच्या या प्रामाणिक भावनांना प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळतोय. बाप्पाकडे केलेली त्यांची ही मनोकामना आणि कुटुंबाशी निगडित आठवणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
हे पण वाचा..“जोपर्यंत ठाकरे बंधू स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत…” Sonalee Kulkarni ची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया









