ADVERTISEMENT

गणेश चतुर्थीला Hruta Durgule हिच्या घरी आली आलिशान BMW, फोटो शेअर करत दिली खुशखबर

लोकप्रिय मराठी अभिनेत्री Hruta Durgule हिने गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिचा पती प्रतीक शाहने आलिशान BMW कार खरेदी केली असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदवार्ता दिली आहे.
Hruta Durgule

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Hruta Durgule सध्या तिच्या ‘आरपार’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मात्र, यावेळी हृता तिच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील एका खास आनंदाच्या क्षणामुळे चर्चेत आली आहे.

गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हृताच्या घरी नवीन पाहुणी आली असून, ती म्हणजेच आलिशान कार. हृताचा पती आणि दिग्दर्शक प्रतीक शाह यांनी निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. ही आनंदवार्ता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली. प्रतीक शाहने आपल्या इंस्टाग्रामवर नवीन कारसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिलं – “यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाने आम्हाला नवी चाके देऊन आशीर्वाद दिला. गणपती बाप्पा मोरया.”

या पोस्टमधील फोटोंमध्ये प्रतीक शाहसोबत Hruta Durgule आणि त्यांची आई मुग्धा शाहही दिसत आहेत. कुटुंबासोबत साजरा केलेल्या या क्षणातील आनंद चाहत्यांनाही जाणवला. प्रतीकच्या या पोस्टवर हृताने लगेचच कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “तुझा खूप अभिमान वाटतो” असे लिहित तिने पतीला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चाहत्यांबरोबरच अनेक सहकलाकार आणि मित्रमंडळींनीही शाह दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

हे पण वाचा.. लग्नानंतरचा पहिला बाप्पा…” : Reshma Shinde ने पतीसोबत साजरा केला गणेशोत्सव; शेअर केले खास फोटो

Hruta Durgule ने आपली कारकीर्द दूरदर्शनवरील ‘दुर्वा’ मालिकेतून सुरू केली. पण ‘फुलपाखरू’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचा चाहता वर्ग मोठा असून तिच्या प्रत्येक प्रकल्पाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. दूरदर्शन मालिकांबरोबरच हृताने नाट्य आणि चित्रपटसृष्टीतही आपली कला सिध्द केली आहे. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ती झळकली, तर ‘टाइमपास ३’, ‘अनन्या’, ‘सर्किट’, ‘कन्नी’ यांसारख्या चित्रपटांतूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. इतकंच नव्हे, तर हिंदी वेबसीरिज ‘कमांडर करण सक्सेना’ मधूनही Hruta Durgule प्रेक्षकांसमोर आली.

आता Hruta Durgule चा ‘आरपार’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. व्यावसायिक यशाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील या नवीन ‘आलिशान पाहुण्या’मुळे हृता आणि प्रतीक शाह यांच्या आयुष्यात दुहेरी आनंदाचं वातावरण आहे.

हे पण वाचा.. Prarthana Behere ने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर सांगितला अनुभव; “थायलंडला शूटिंगसाठी गेले तेव्हा पाय सुजला”

Hruta Durgule इंस्टाग्राम पोस्ट..