ADVERTISEMENT

Atharva Sudame नंतर Danny Pandit च्या रीलची चर्चा; गणेशोत्सवातून दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर Danny Pandit याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रीलला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, त्याच्या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Danny Pandit

गणेशोत्सव हा सण केवळ श्रद्धेपुरता मर्यादित नसून तो समाजात बंधुभाव आणि एकतेची नाळ जिवंत ठेवणारा पर्व मानला जातो. यंदा या सणात सोशल मीडियावर अनेक रील्स आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेच्या एका व्हिडीओवर टीका झाली होती, परंतु त्यानंतर आता प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर डॅनी पंडित (Danny Pandit) याच्या रीलने लोकांची मनं जिंकली आहेत. त्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारा व्हिडीओ शेअर केला असून, नेटकऱ्यांनी या रीलवर भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Danny Pandit च्या व्हिडीओत गणेशोत्सवातील एक सुंदर प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबीयांसह तो गणपती बाप्पाची आरती करत असतो. त्यावेळी शेजारी राहणारी मुस्लीम मुलगी झोयादेखील भक्तिभावाने आरतीत सहभागी होते. तिच्या आईचा आवाज आल्याने झोया आरती सोडून बाहेर जाते आणि काही क्षणात हातात ताट घेऊन परत येते. जेव्हा Danny Pandit ताट उघडतो तेव्हा त्यात बाप्पासाठी उकडीचे मोदक ठेवलेले दिसतात. झोया सांगते की, हे तिच्या अम्मीने बाप्पासाठी प्रसाद म्हणून पाठवले आहेत. अखेरीस झोयाची आईही प्रसाद घेऊन गणेशोत्सवात सहभागी होताना दिसते. या प्रसंगाने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गोड संदेश सर्वत्र पोहोचला आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओचं प्रचंड कौतुक केलं आहे. काहींनी कमेंट करत लिहिलं, “डॅनी सलाम आहे तुला”, “खूप सुंदर संदेश आहे”, “गणेशोत्सव म्हणजे एकता आणि बंधुभाव”. अभिनेता सारंग साठेनं देखील या रीलवर रेड हार्ट इमोजी टाकत पाठिंबा दर्शवला.

याउलट, काही दिवसांपूर्वी अथर्व सुदामे (Atharva Sudame) च्या व्हिडीओला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्याच्या व्हिडीओत तो मुस्लिम मूर्तीकाराकडून गणपतीची मूर्ती घेत असल्याचे दाखवले होते. मात्र, सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर त्याने तो व्हिडीओ डिलिट करून माफी मागितली होती.

हे पण वाचा.. “गिरीजाचा गाल धरला अन्…” Madhavi Nimkar ने सांगितला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ च्या सेटवरील किस्सा

Danny Pandit हा सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा आहे. खरं नाव मुकेश पंडित असलेला डॅनी युट्यूबर, कंटेंट क्रिएटर आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखला जातो. तो काही वेबसीरिजमध्ये झळकला आहे. सध्या तो ‘नॉर्मल डे विथ डॅनी पंडित – ए डॅनी पंडित लाइव्ह शो’ या कार्यक्रमाचे प्रयोग करत असून, या शोला चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे, अभिनयासोबतच Danny Pandit हा व्यावसायिक वकील असून, त्याने बी.कॉम, एलएलबी आणि कंपनी सेक्रेटरीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कंटेंटमधून नेहमीच वादंग निर्माण होतात, पण Danny Pandit च्या रीलने मात्र सकारात्मक संदेश दिला आहे. गणेशोत्सव हा एकता, श्रद्धा आणि सांस्कृतिक बंध वाढवणारा सण आहे, याची आठवण करून देणारा त्याचा प्रयत्न नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे.

हे पण वाचा.. ट्रेनमधला  प्रसंग; Abhidnya Bhave ने सांगितली बालपणीची आठवण, व्यक्त केलं ठाम मत

Danny Pandit इंस्टाग्राम पोस्ट..