ADVERTISEMENT

Vivek Sangle चा संकल्प : शाडूच्या मूर्तीनेच बाप्पाचं स्वागत, गणेशोत्सवात पर्यावरणपूरक संदेश”

अभिनेता Vivek Sangle यंदा पहिल्यांदाच आपल्या नव्या घरात बाप्पाचं स्वागत करत आहे. कोविडनंतर त्याने शाडूच्या मातीची मूर्ती आणि इको-फ्रेंडली सजावटीचा संकल्प केला असून, चाहत्यांना पर्यावरण जपण्याचा संदेश दिला आहे.
Vivek Sangle

मुंबई :’लग्नानंतर होईलच प्रेम‘ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता विवेक सांगळे (Vivek Sangle) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास टप्प्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्यानं मुंबईतील लालबाग परिसरात नवीन घर घेतलं आणि त्यात पारंपरिक गृहप्रवेशही पार पाडला. या नव्या घरात यंदा प्रथमच बाप्पाचं आगमन झालं असून, या प्रसंगी Vivek Sangle नं आपल्या श्रद्धेबरोबरच पर्यावरणपूरकतेचं भानही जपलं आहे.

गणेशोत्सवाबाबत Vivek Sangle यंदा विशेष उत्साहात दिसला. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं की, कोरोनानंतर त्यानं एक ठाम निर्णय घेतला आहे – घरात आणली जाणारी मूर्ती ही नेहमी शाडूच्या मातीचीच असावी. त्यानं स्पष्ट केलं, “लोकांना फक्त सांगून काही होत नाही, बदल स्वतःपासून सुरू करायला हवा. त्यामुळे मी गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या मातीची मूर्तीच खरेदी करतो आणि यंदाही हाच निर्णय कायम ठेवला.”

फक्त मूर्तीच नव्हे तर सजावटही विवेकनं पर्यावरणपूरकच केली आहे. त्याने सांगितलं की, कुठलाही कृत्रिम पदार्थ, प्लास्टिक वा आर्टिफिशियल डेकोरेशन वापरलेलं नाही. “शाडूच्या मातीतली मूर्ती आपोआपच आकर्षक दिसते. तिच्या नैसर्गिक सौंदर्याला कुठल्याही कृत्रिमतेची गरज नसते,” असं तो म्हणाला.

Vivek Sangle च्या घरी बाप्पाचं आगमन मागील १४ वर्षांपासून होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून तो सातत्याने शाडूच्या मूर्तीचीच निवड करत आहे. त्यामुळे भक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचं सुंदर नातं तो जपत आहे.

हे पण वाचा.. बाई काय हा लूक! Nikki Tamboli ने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

मुलाखतीत त्याला विचारलं गेलं की, नवीन घर झाल्यामुळे यंदा बाप्पाकडे काही खास मागणी करणार आहेस का? यावर Vivek Sangle हसतच म्हणाला, “मनातल्या इच्छा नेहमीच बाप्पाला सांगतो. पण यंदा सगळ्यात मोठी इच्छा म्हणजे माझ्या नव्या घरात सुख, शांती आणि आनंद नांदो.”

नवीन घर, बाप्पाची आराधना आणि पर्यावरणपूरक उपक्रम – यामुळे Vivek Sangle चा यंदाचा गणेशोत्सव चाहत्यांसाठी आणि पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा.. ३६ व्या मजल्यावर नवं घर! Amit Bhanushali चं स्वप्नपूर्तीचं क्षण, पत्नी श्रद्धेने व्यक्त केल्या भावना

Vivek Sangle इंस्टाग्राम पोस्ट..