बिग बॉसच्या मंचावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Nikki Tamboli पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा ताजाताजा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्यावर कौतुकाचा पाऊस पाडला आहे.
सध्या Nikki Tamboli दुबईत आपल्या बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याचा अनुभव आणि रोमँटिक क्षण ती सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमध्ये Nikki Tamboli हातात चहाचा कप घेऊन आरशासमोर पोझ देताना दिसते. तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी “बाई काय हा प्रकार!” अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला ‘गॉर्जियस’ म्हणत कौतुकाचा वर्षाव केला तर काहींनी हार्ट इमोजींचा पाऊस पाडला.
Nikki Tamboli ची ओळख ‘बिग बॉस 14’मुळे सर्वत्र झाली. तिचा बिनधास्त अंदाज, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि क्यूटनेसने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ती ‘खतरों के खिलाड़ी 11’ या शोमध्ये थरारक स्टंट्स करताना दिसली होती. याशिवाय ती अनेक लोकप्रिय म्युझिक व्हिडिओंमध्येही झळकली आहे.
अभिनेत्री म्हणून Nikki Tamboli ने हिंदीसह तेलुगू आणि तमिळ सिनेमातही आपली कला दाखवली आहे. केवळ 29 व्या वर्षी ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिचं मराठीशीही नातं घट्ट आहे. ती ‘बिग बॉस मराठी सीजन 5’मध्ये स्पर्धक होती आणि तिथे तिने सेकंड रनर-अप पद पटकावलं. याच शोमध्ये तिची अरबाज पटेलशी ओळख झाली आणि दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.
हे पण वाचा.. कॉस्मेटिक सर्जरीवर Madhavi Nimkar चं स्पष्ट मत; “नैसर्गिक सौंदर्य जपणं महत्वाचं पण…”
अरबाज पटेल बिग बॉस 19 मध्ये सहभागी होणार अशी चर्चा होती, मात्र सध्या तो या शोचा भाग नाही. दरम्यान, सलमान खानच्या होस्टिंगखाली 24 ऑगस्टला ग्रँड प्रीमियर पार पडला आणि 16 स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली आहे. लवकरच आणखी तीन वाइल्ड कार्ड एन्ट्रीज होणार आहेत.
Nikki Tamboli मात्र सध्या रिअॅलिटी शोऐवजी आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि ट्रॅव्हल लाइफमध्ये रमली आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर मिळणाऱ्या जबरदस्त प्रतिक्रियांनी ती अजूनही चाहत्यांच्या मनात किती लोकप्रिय आहे हे स्पष्ट होतं.
हे पण वाचा.. Atharva Sudame च्या व्हिडीओ वादावर छोटा पुढारीची भूमिका; म्हणाला, ‘इतिहास माहिती नसेल तर अशा गोष्टी टाळा’”









