गणेश चतुर्थी म्हणजे आनंद, उत्साह आणि कौटुंबिक एकत्रितपणाचा सण. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता Kiran Gaikwad साठी यंदाचा गणेशोत्सव अधिकच खास ठरला आहे. कारण लग्नानंतर तो पहिल्यांदाच पत्नी वैष्णवी कल्याणकरसोबत बाप्पाचं स्वागत करत आहे.
किरण आणि वैष्णवीने डिसेंबर २०२४ मध्ये विवाहबद्ध होत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव त्यांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरला आहे. किरणनं नुकतंच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये त्यांच्या घरातील बाप्पाची आकर्षक आरास, फुलांची सजावट आणि कुटुंबीयांसोबतचे आनंदाचे क्षण टिपलेले दिसतात.
फोटोंमध्ये किरण आणि वैष्णवी या नवविवाहित जोडप्याचा उत्साह स्पष्ट जाणवतो. बाप्पाच्या मूर्तीमागे सुंदर फुलांची सजावट, दिव्यांची रोषणाई आणि सणाचा पारंपरिक माहोल खास उठून दिसतो. मालिकांच्या चित्रीकरणातून ब्रेक घेऊन किरणनं कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला असून, हे क्षण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचं चाहत्यांना जाणवत आहे.
हे पण वाचा.. जावई कुणालने पाळला दिलेला शब्द! गणेशोत्सवासाठी Ankita Walawalkar सोबत पोहोचला माहेरी
दरम्यान, Kiran Gaikwad सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. नुकतीच या मालिकेत अभिनेते मिलिंद शिंदे यांची एन्ट्री झाली असून, त्यामुळे कथानकाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. दुसरीकडे अभिनेत्री एकता डांगरची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. त्यामुळे मालिकेच्या पुढील भागांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त अनेक कलाकार आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. त्यात Kiran Gaikwad च्या या पोस्टने चाहत्यांना विशेष आनंद दिला आहे. लग्नानंतरच्या पहिल्या सणाचे हे क्षण चाहत्यांमध्येही उत्साहाचं कारण बनले असून, सोशल मीडियावर त्याच्या या पोस्टला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.
हे पण वाचा.. Atharva Sudame च्या व्हिडीओ वादावर छोटा पुढारीची भूमिका; म्हणाला, ‘इतिहास माहिती नसेल तर अशा गोष्टी टाळा’”









