ADVERTISEMENT

कॉस्मेटिक सर्जरीवर Madhavi Nimkar चं स्पष्ट मत; “नैसर्गिक सौंदर्य जपणं महत्वाचं पण…”

कॉस्मेटिक सर्जरीवर Madhavi Nimkar चं स्पष्ट मत; "नैसर्गिक सौंदर्य जपणं महत्वाचं पण..."
Madhavi Nimkar

मनोरंजनसृष्टीत अनेकदा सौंदर्य टिकवण्यासाठी कलाकार वेगवेगळ्या पद्धतींचा आधार घेतात. काही जणी नैसर्गिक सौंदर्याला प्राधान्य देतात तर काही अभिनेत्री वेळोवेळी बोटॉक्स, फिलर्स किंवा इतर कॉस्मेटिक सर्जरी करून आपला लूक कायम ठेवतात. लोकप्रिय अभिनेत्री Madhavi Nimkar हिने अलीकडेच या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली असून तिचं मत सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली Madhavi Nimkar ही स्वतःच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. नियमित योगा आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे तिचं नाव ‘नॅचरल ब्युटी’ म्हणून घेतलं जातं. पण सौंदर्य टिकवण्यासाठी केले जाणारे बोटॉक्स किंवा प्लास्टिक सर्जरी याबद्दल विचारलं असता तिने दिलेलं उत्तर तिच्या चाहत्यांना भावलं.

माधवी म्हणाली, “आजकाल केवळ अभिनेत्रीच नव्हे तर सामान्य मुली देखील फिलर्स किंवा सर्जरी करतात. हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. चेहरा आणि शरीर हे कलाकारासाठी महत्वाचं असतं. पडद्यावर प्रेक्षकांना आपण कसे दिसतो यावर त्यांचा प्रतिसाद अवलंबून असतो. जर एखाद्याला वाटत असेल की अशा प्रक्रियांमुळे आत्मविश्वास वाढतो किंवा अजून सुंदर दिसता येईल, तर त्यात काही गैर नाही.”

हे पण वाचा.. Nikki Tamboli गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज, अरबाजसोबत करतेय खास डेकोरेशन!

तिने पुढे स्पष्ट केलं की, “आपण अनेक अशा अभिनेत्री पाहतो ज्यांनी बोटॉक्स किंवा इतर सर्जरी केली आहे, पण त्यामुळे त्यांना प्रेक्षकांनी नाकारलेलं नाही. उलट त्या तितक्याच आवडीने पाहिल्या जातात. मला स्वतःला सध्या अशी काही गरज नाही, पण ज्यांना वाटतं त्यांनी नक्कीच ते करावं. फक्त ते सुरक्षित असावं आणि आरोग्यावर परिणाम करणारे दुष्परिणाम होऊ नयेत, एवढीच काळजी घ्यावी.”

तिच्या या वक्तव्याने हे स्पष्ट होतं की Madhavi Nimkar नैसर्गिक सौंदर्य जपते, मात्र इतरांच्या निर्णयाचा सन्मानही करते. आजच्या काळात अभिनेत्रींसाठी सौंदर्य टिकवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आत्मविश्वास ठेवणंही गरजेचं आहे. तिच्या मनमोकळ्या उत्तरामुळे चाहत्यांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली आहे.

हे पण वाचा.. Tejashree Pradhan चा गणेशोत्सव खुलणार मोदकांच्या गोडीत, म्हणाली – “मोदक आणि माझी वीण अतूट आहे”

Madhavi Nimkar इंस्टाग्राम पोस्ट..