‘Tharala Tar Mag’ मालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून पूर्णा आजींची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ५३ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत त्यांनी अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिका गाजवल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं केवळ मालिकेच्या टीमलाच नव्हे तर लाखो प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला.
पूर्णा आजींच्या निधनानंतर मालिकेत त्यांच्या भूमिकेची रिप्लेसमेंट होणार का, हा प्रश्न सतत चर्चेत आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर “पूर्णा आजींची भूमिका कुणीही साकारणार नाही, तिला रिप्लेस करू नका” अशी विनंती केली आहे.
या पार्श्वभूमीवर मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “पूर्णा आजींची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मात्र, ही मालिका आहे आणि कथानकाच्या गरजेनुसार निर्णय घ्यावा लागेल. लवकरच याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल.”
तसंच, मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारणारे अमित भानुशाली यांनी इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. ते म्हणाले, “आजपर्यंत आम्ही रिप्लेसमेंटबद्दल विचारही केलेला नाही. अजूनही आम्ही या धक्क्यातून बाहेर आलेलो नाही. मात्र एवढं नक्की सांगतो की, पूर्णा आजी आमच्या हृदयात कायम आहेत आणि त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही.”
हे पण वाचा.. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर Vaibhav Managle संतप्त; म्हणाले, “गेली १७ वर्ष वाट पाहतोय…”
अमितने पूर्णा आजींबरोबरच्या अनेक आठवणी सांगितल्या. “त्या नेहमी सेटवर खाऊ घेऊन यायच्या. खास करून पुण्यातून क्रीम रोल आणायच्या. जवळपास ८-१० बॉक्स त्या कलाकारांसाठी आणायच्या. त्यांचा तो प्रेमळ स्वभाव, जिव्हाळा आणि काळजी कधीच विसरता येणार नाही. त्या आजही आमच्यासोबत आहेत,” असं तो भावुक होत म्हणाला.
‘Tharala Tar Mag’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिकच संवेदनशील ठरतो आहे. चाहत्यांची भावना लक्षात घेऊनच चॅनेल आणि प्रोडक्शन हाऊस अंतिम निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
हे पण वाचा.. Ravi Jadhav यांची खास गणेशभक्ती; स्वतःच्या हाताने साकारली बाप्पाची मूर्ती, व्हिडीओ पाहून चाहत्यांचे कौतुक









