ADVERTISEMENT

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर Vaibhav Managle संतप्त; म्हणाले, “गेली १७ वर्ष वाट पाहतोय…”

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे कोकणवासीयांचे हाल होत असतानाच अभिनेते Vaibhav Managle यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं केलं. “गेली १७ वर्ष रस्ता होण्याची वाट पाहतोय,” असं सांगत त्यांनी प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं.
Vaibhav Managle

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे हा नवा विषय नाही. गेली अनेक वर्षं कोकणवासीय या समस्येला तोंड देत आहेत. प्रत्येक वर्षी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चर्चा रंगते, आश्वासने दिली जातात, पण परिस्थिती मात्र जसंच्या तशी राहते. सध्या गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हजारो चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईहून कोकणाची वाट धरत आहेत. पण सुरक्षित आणि सुखकर प्रवासाऐवजी त्यांना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Managle) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यातून त्यांनी प्रशासनावरच नव्हे तर प्रवाशांनाही महत्त्वाचा संदेश दिला आहे.

आपल्या पोस्टमध्ये Vaibhav Managle म्हणतात, “गेली १७ वर्ष आपण हा रस्ता चांगला होईल अशी वाट पाहतोय. आता तो होण्याच्या मार्गावर आहे, पण अजूनही काही भागात भीषण परिस्थिती कायम आहे. मी आजच देवरुखला आलो. माणगावजवळचा, चिपळूण आणि संगमेश्वर परिसरातील रस्ते अजूनही अपुरे आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “माणगाव आणि संगमेश्वर येथे तर परिस्थिती फारच बिकट आहे. हा रस्ता पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही. आजूबाजूला घनदाट वस्ती आहे, तिथून रस्ता काढणं किती कठीण आहे हे कुणालाच ठाऊक नाही. मात्र उर्वरित भाग चांगला झालेला आहे.”

अभिनेता असूनही सामाजिक विषयांवर नेहमीच ठाम भूमिका घेणारे Vaibhav Managle यांनी यावेळीही प्रवाशांना थेट संदेश दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे, “सावकाश या. घाई करू नका. विरुद्ध दिशेनं गाड्या चालवू नका. चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघाताचा धोका वाढतो. सर्वांनी सुरक्षित प्रवास करा, शुभयात्रा.”

त्यांच्या या शब्दांतून रस्त्यावरील भीषण अवस्थेबद्दलची नाराजी दिसून येते, तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दलची काळजीही जाणवते.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी, खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे होणारा त्रास यावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटतात. अनेकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. महामार्गाचं काम सुरू होऊनही ते पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने कोकणवासीयांमध्ये नाराजी आहे.

Vaibhav Managle हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवणारे मांगले सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. त्यांचे फोटो, चित्रपटांच्या पोस्ट तसेच सामाजिक आणि राजकीय घडामोडींवरच्या त्यांच्या थेट प्रतिक्रिया अनेकदा चर्चेत येतात. आता मुंबई-गोवा महामार्गावरील दुरवस्थेवर त्यांनी व्यक्त केलेलं मत पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

हे पण वाचा.. वादांपासून दूर राहण्याचं गुपित उघड करत Gashmeer Mahajani अभिनेत्याने दिलं चाहत्याला हटके उत्तर..

मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेली अनेक वर्षं अपुरं आहे. काही भागांमध्ये सुधारणा झाल्याचं मान्य करतानाच Vaibhav Managle यांनी माणगाव आणि संगमेश्वर परिसरातील भीषण परिस्थिती अधोरेखित केली आहे. त्यांच्या या पोस्टमधून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं, अशीच मागणी जनतेतून पुन्हा एकदा होताना दिसत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो कोकणवासीय आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी वैभव मांगले यांनी केलेलं आवाहन निश्चितच महत्त्वाचं ठरतं.

हे पण वाचा.. Rinku Rajguru चा रॉयल अंदाज! ऐश्वर्या रायच्या गाण्यावर शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाकारांचा कमेंट्सचा वर्षाव

Vaibhav Managle इंस्टाग्राम पोस्ट..