बॉलीवूडमध्ये सातत्याने नवनव्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर चमकण्याची संधी मिळते. यावर्षी प्रेक्षकांसमोर आलेल्या ‘रेड २’ या चित्रपटाने केवळ तिकीटबारीवर विक्रमी कामगिरी केली नाही, तर अनेक कलाकारांना खास ओळखही मिळवून दिली. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या दमदार अभिनयाने भारावलेल्या या चित्रपटात अभिनेत्री रितिका श्रोत्री (Ritika Shrotri) लाही महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
अभिनेत्री Ritika Shrotri ने नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटातील तिच्या प्रवासाबद्दल, विशेषत: रितेश देशमुख आणि अजय देवगणसोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितलेले किस्से केवळ रसिकांसाठी रोचक नाहीत, तर नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायीही आहेत.
Ritika Shrotri ने या चित्रपटासाठी दिलेली ऑडिशन तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. “पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी ऑडिशन दिली आणि काही दिवसांतच निवडीचा फोन आला,” असे सांगत तिने त्या क्षणाची आठवण सांगितली. या भूमिकेसाठी तिचं लखनौला अवघ्या पाच-सहा दिवसांचं शूट होतं. त्यात तिला काही महत्त्वाच्या सीनमध्ये सहभागी व्हायचं होतं. या संधीबद्दल ती म्हणाली, “मी खूप तयारी केली होती, पण सेटवर गेल्यावर लक्षात आलं की खरी कसोटी ही कॅमेऱ्यासमोरच आहे.”
Ritika Shrotri चा पहिला सीन थेट रितेश देशमुखसोबत होता. ती स्वतःच त्यांची मोठी चाहती असल्याने तिचा उत्साह आणि तणाव दोन्हीही वाढलेले होते. रितिकाने सांगितलं, “रितेश सर अतिशय साधेपणाने आणि आदराने बोलतात. सेटवर त्यांचं वागणं बघून मी थोडी गोंधळलेही होते.”
यापुढे Ritika Shrotri ने रितेशसोबतचा एक खास अनुभव शेअर केला. “आमच्या एका सीनचा आधी वाईड शॉट झाला आणि नंतर त्यांचा क्लोज शॉट झाला. त्यानंतर माझा क्लोज सीन बाकी होता. साधारणपणे अशावेळी कलाकार आपला सीन झाल्यावर निघून जातात, पण रितेश सर मात्र थांबले. त्यांनी स्वतःच सांगितलं, ‘मी थांबतो, तुझा सीन पूर्ण कर.’ त्या क्षणी मला जाणवलं की खराखुरा कलाकार तोच, जो दुसऱ्यालाही तितकीच महत्त्व देतो. तो क्षण माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरला.”
काही दिवसांनी रितिकाला अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल Ritika Shrotri म्हणाली, “अजय सरांचा सीन माझ्यासोबत केवळ चार मिनिटांत शूट झाला. पण त्या अल्पावधीतच त्यांनी दाखवलेली एकाग्रता आणि सहजता मला खूप काही शिकवून गेली.”
क्लायमॅक्सच्या शूटिंगचा अनुभवही रितिकासाठी तितकाच खास होता. “तीन दिवस सलग चाललेल्या त्या शूटिंगमध्ये जवळपास हजार ते पंधराशे लोक उपस्थित होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शूटमध्ये सहभागी होणं ही स्वतःतच एक अविस्मरणीय आठवण आहे,” असे तिने सांगितले.
Ritika Shrotri ने मराठी चित्रपटसृष्टीतून सुरुवात करून हिंदी चित्रपटात स्थान मिळवलं आहे. तिच्या नैसर्गिक अभिनयाने आणि मेहनतीमुळे ती आजच्या तरुण कलाकारांमध्ये विशेष स्थान मिळवते आहे. ‘रेड २’सारख्या मोठ्या चित्रपटातून तिला मिळालेलं व्यासपीठ तिच्या करिअरसाठी नक्कीच महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.
रितेश देशमुखसोबतचा अनुभव सांगताना तिने स्पष्ट केलं की खऱ्या अर्थाने सहकलाकार कसा असावा हे तिला त्यांच्या वागणुकीतून शिकायला मिळालं. तर अजय देवगणसोबतच्या शूटमुळे तिला प्रोफेशनलिझम आणि वेळेचं महत्त्व उमगलं.
हे पण वाचा.. “अंबर गणपुळेच्या वाढदिवशी पत्नी Shivani Sonar ची खास पोस्ट; म्हणाली – You Are My Home”









