मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंबर गणपुळे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला हा अभिनेता आज प्रेक्षकांचा लाडका बनलेला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून, सहकलाकारांकडून आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शुभेच्छांच्या गर्दीत त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) हिने केलेली खास पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
शिवानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंबरसोबतचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये Shivani Sonar ने लिहिले आहे, “एके दिवशी अचानक एका मुलाची माझ्या आयुष्यात एन्ट्री झाली. त्याचं येणं पूर्णपणे अनपेक्षित होतं. काहीच ठरलेलं नव्हतं, पण त्याच्यात काहीतरी वेगळेपण होतं. त्याने मला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवलं. कोणावर आपण भावनिकदृष्ट्या अवलंबून राहतो हे किती सुंदर अनुभव असतो, हे त्याच्यामुळे मला कळलं. इतक्या अनपेक्षितपणे आलेला तो मुलगा आज माझा जीवनसाथी झाला आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा… You Are My Home.”
या रोमँटिक पोस्टवर अंबर गणपुळेनेदेखील तत्काळ रिप्लाय देत “आय लव्ह यू” असे लिहिले आहे. चाहत्यांनीही या दोघांच्या प्रेमळ नात्याचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अंबर गणपुळेने मराठी टेलिव्हिजनवर अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून त्याने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ‘दुर्गा’, ‘लोकमान्य’ अशा मालिकांमधून त्याने आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडली. त्याच्या सहजसुंदर अभिनयामुळे तो प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे.
आज वाढदिवसानिमित्त केवळ चाहत्यांकडूनच नाही, तर त्याचे सहकलाकार देखील शुभेच्छा देत आहेत. रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले यांसारख्या कलाकारांनी अंबरसाठी विशेष पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री Shivani Sonar हिने ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रियता मिळवली. मालिकेतील ‘संजू’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यानंतर तिने लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेसोबत ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका केली.
सध्या Shivani Sonar झी मराठीवरील ‘तारिणी‘ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिच्यासोबत स्वराज नागरगोजे आणि अभिज्ञा भावे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.
शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांनी यावर्षी २१ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत आयुष्याचा आनंद घेत असून, त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्सवरून त्यांच्या नात्यातील गोडवा सहज जाणवतो.
हे पण वाचा.. १० वर्षांनी Sonali Khare ची दमदार एन्ट्री! ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत
Shivani Sonar च्या या खास पोस्टनंतर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी “बेस्ट कपल“, “खूप सुंदर शब्द”, “तुम्ही दोघे कायम असेच एकत्र राहा” अशा शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी अंबरच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता अंबर गणपुळे आणि अभिनेत्री Shivani Sonar हे मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक आकर्षक आणि लोकप्रिय जोडपे मानले जाते. अंबरच्या वाढदिवशी शिवानीने केलेली ही भावनिक पोस्ट त्यांच्या प्रेमसंबंधातील गोडवा अधोरेखित करणारी ठरली आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीसोबतच, वैयक्तिक आयुष्यातील या नात्याची झलक प्रेक्षकांना सतत प्रेरणादायी ठरत आहे.
हे पण वाचा.. ‘देवमाणूस’ फेम Ekta Dangar चा निरोप; शेवटचा सीन शूट करताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितला थरारक अनुभव









