ADVERTISEMENT

ऑनलाइन गेमिंग बंदीवर Dhananjay Powar ची ठसकेबाज प्रतिक्रिया म्हणाला…, “कष्ट करून कमवा दाम” सरकारचं केलं कौतुक

ऑनलाइन गेमिंगविरोधी सरकारच्या निर्णयावर बिग बॉस मराठी फेम Dhananjay Powar ने आपली खास कोल्हापुरी शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याने मेहनतीने पैसे कमवण्याचा संदेश दिला आणि सरकारच्या या निर्णयाचं टाळ्यांनी स्वागत केलं.
Dhananjay Powar

Dhananjay Powar On Online Gaming Bill :
ऑनलाइन गेमिंगविरोधी केंद्र सरकारच्या निर्णयावर अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. त्यातच ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेता धनंजय पोवार (Dhananjay Powar) याने सोशल मीडियावर खास अंदाजात प्रतिक्रिया देत या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडीओत सरकारच्या या पावलाला जोरदार दाद दिली असून, मेहनतीने पैसे कमवण्याचा संदेशही दिला आहे.

केंद्र सरकारने नुकतंच ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल २०२५’ लोकसभेत मंजूर केलं. या विधेयकाचा उद्देश ऑनलाइन मनी गेम्स, सट्टेबाजी आणि अशा प्रकारच्या जुगारासारख्या गोष्टींवर कडक नियंत्रण ठेवणे आहे. देशात वाढत्या प्रमाणावर ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे आत्महत्या, फसवणूक, आर्थिक नुकसान आणि कुटुंबं उद्ध्वस्त होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, समाजात निर्माण होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.

या कायद्यानुसार, ज्या अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन जुगार किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन दिलं जातं, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. जाहिरातींमधून सट्टेबाजी किंवा ऑनलाइन मनी गेम्सचं प्रमोशन करणाऱ्यांनाही आता दंड आणि शिक्षा होऊ शकते. तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि एक कोटी रुपयांचा दंड अशी तरतूद या विधेयकात आहे.

सरकारच्या या निर्णयावर अभिनेता Dhananjay Powar ने त्याच्या खास कोल्हापुरी शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणतो,
“कष्ट… कष्ट… लोकांचं उष्ट खायचं नाही. कष्ट करून पोट भरून खायचं. सरकारच्या या निर्णयाचं मी टाळ्या वाजवत स्वागत करतो. पहिल्यांदा मला कुठला तरी निर्णय आवडला आहे.”

यातून त्याने मेहनतीने पैसे कमवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. तसेच ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींवर कटाक्ष टाकत त्याने प्रश्न केला, “आता पुन्हा ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करणार का?”

यानंतर त्याच्या कोल्हापुरी टचमध्ये त्याने पुढे म्हटलं,
“काम केलं की घाम येतो, घाम गाळला की दाम मिळतं. बसून मिळालेलं दाम ठाम राहत नाही. आता हे सरकार आलंय तुमचं काम घ्यायला… तीन वर्षांची शिक्षा आणि एक कोटींचा दंड… सुपला शॉट!”

Dhananjay Powar नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या हटके आणि विनोदी अंदाजामुळे चर्चेत असतो. त्याचे व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडतात. सरकारच्या या निर्णयावर केलेल्या त्याच्या प्रतिक्रियेलाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी त्याच्या व्हिडीओवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं.

चाहत्यांनी लिहिलं की, “धनंजय, तू नेहमीच साध्या पण ठसकेबाज पद्धतीने बोलतोस, त्यामुळे तुझे विचार थेट मनाला भिडतात.” आणखी एका चाहत्याने लिहिलं, “ऑनलाइन गेमिंगमुळे खूप लोक बुडालेत, सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि तुझा हा व्हिडीओ त्याला अधिक ताकद देतो.”

हे पण वाचा.. Gaurav More : अपमान पचवणं हीच ताकद, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अभिनेत्याचे शब्द ऐकून सगळे भावुक

गेल्या काही वर्षांत देशात ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या व्यसनाने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. विशेषतः तरुण पिढी या आकर्षणात अडकली होती. पैशांच्या मोहापायी अनेकांनी कर्ज काढलं, फसवणुकीचे बळी ठरले आणि शेवटी आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गाला लागले. पालकांनी यावर चिंता व्यक्त केली होती.

सरकारने घेतलेला हा निर्णय त्यामुळे समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. हे विधेयक लागू झाल्यानंतर अशा अॅप्सवर आळा बसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

हे पण वाचा.. Vijay Andalkar : “ती खूप छळते…” ज्ञानदा रामतीर्थकरबरोबरच्या ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल दिली मजेशीर प्रतिक्रिया

ऑनलाइन गेमिंगविरोधी विधेयकाने मोठी चर्चा निर्माण केली असताना Dhananjay Powar ने या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं आहे. त्याच्या खास कोल्हापुरी भाषेत दिलेली प्रतिक्रिया लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते आणि मेहनतीने पैसे कमवण्याचा संदेश देते. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून, सोशल मीडियावर पोवारच्या व्हिडीओला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Dhananjay Powar इंस्टाग्राम पोस्ट..