झी मराठीवरील ‘तारिणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली आहे. या मालिकेत अभिनेत्री Shivani Sonar आणि अभिनेता स्वराज नागरगोजे यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. दोघेही स्पेशल ऑफिसरच्या दमदार भूमिकेत दिसत आहेत आणि त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवानी सोनारने आपल्या सहकलाकारासोबत जुळलेल्या नात्यावर, शूटिंगदरम्यान घेतलेल्या अनोख्या अनुभवांवर आणि सोशल मीडियाच्या प्रभावावर मनमोकळेपणाने बोलली.
Shivani Sonar ने सांगितलं की मालिकेच्या सुरुवातीच्या दिवसांत तिचं आणि स्वराजचं मैत्र जुळायला थोडा वेळ लागला. ती म्हणाली, “स्वराज तेव्हा मालाडला राहत होता आणि मी बोरिवलीला. आम्ही शूटिंगसाठी एकत्र गाडीतून प्रवास करायचो. घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये तासन्तास अडकताना सुरुवातीला आम्हाला काय बोलायचं हेच समजत नव्हतं. मात्र हळूहळू आम्ही प्रश्न विचारायला लागलो, गप्पा रंगल्या आणि तिथूनच आमच्या बॉण्डिंगला सुरुवात झाली.”
या छोट्याशा अनुभवातून स्पष्ट होतं की कलाकारांच्या पडद्यामागच्या नात्यांचा पाया साध्या गप्पांतून आणि रोजच्या सहवासातूनच घट्ट होतो.
मालिकेत स्पेशल ऑफिसरची भूमिका साकारताना कलाकारांना अनेकदा अॅक्शन सीन करावे लागतात. त्यात खरी बंदूक हाताळण्याची वेळ येते. या अनुभवाबद्दल सांगताना Shivani Sonar म्हणाली, “पहिल्यांदा खरी बंदूक हातात घेतली तेव्हा तिचं वजन आणि आवाज यामुळे आम्ही थोडे दचकलो. सुरुवातीला भीती वाटली, पण वेळ जसा गेला तसं हाताला त्या वजनाची आणि कानांना आवाजाची सवय झाली. आता शूटिंग करताना ते नैसर्गिक वाटतं.”
हा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय असल्याचं ती पुढे सांगते. तिच्या बोलण्यातून दिसून येतं की कलाकार आपल्या भूमिकेसाठी किती मनापासून तयारी करतात.
आजच्या पिढीत सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. याबद्दल बोलताना Shivani Sonar म्हणाली, “आज आपण वर्तमानपत्र कमी वाचतो, टीव्हीवर बातम्या बघण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. बहुतेक वेळा आपण सोशल मीडियावरूनच माहिती घेतो. पण तिथे नकारात्मक बातम्यांचं प्रमाण फार जास्त आहे. अपघात, अघोरी प्रकार यांच्या बातम्या वारंवार दिसतात. अशा बातम्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, पण खोट्या व फेक बातम्याही खूप व्हायरल होतात आणि त्यावर नियंत्रण आणणं आवश्यक आहे.”
अभिनेत्रीच्या या वक्तव्याला अनेक प्रेक्षक दाद देत आहेत. सोशल मीडियावर पसरणाऱ्या नकारात्मकतेबद्दल तीने दाखवलेली जाणीव तरुणांना विचार करायला भाग पाडते.
हे पण वाचा.. Chetan Vadnere मोठं वक्तव्य…, ‘लपंडाव’ मालिकेत सायली संजीव का नाही?
‘तारिणी’ मालिकेचं कथानक आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. Shivani Sonar आणि स्वराज नागरगोजे यांच्या केमिस्ट्रीने मालिकेला वेगळं उंची मिळालं आहे. दोघांचेही अभिनय कौशल्य आणि पडद्यामागील घट्ट झालेलं नातं मालिकेत दिसणाऱ्या सहजतेतून प्रकट होतं.
Shivani Sonar ने स्वतःच्या अनुभवांमधून सांगितलेल्या या गोष्टी प्रेक्षकांना कलाकारांच्या जीवनातील वास्तवाची झलक दाखवतात. पडद्यावर गंभीर आणि ताकदीच्या भूमिकेत दिसणारे कलाकार पडद्यामागे किती साधे आणि मनमोकळे असतात याची जाण होते.
हे पण वाचा.. Vijay Andalkar : “ती खूप छळते…” ज्ञानदा रामतीर्थकरबरोबरच्या ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल दिली मजेशीर प्रतिक्रिया









