ADVERTISEMENT

दिलखुलास हसणारी आमची आई… Tejaswini Pandit ला मातृशोक, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं ६९ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Tejaswini Pandit

पुणे | मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्या आई आणि मराठी रंगभूमी, चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. १६ ऑगस्ट रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्या निधनाची माहिती समोर येताच मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, चांदेकर यांच्या जाण्याने केवळ एका उत्तम अभिनेत्रीचा नाही तर तेजस्विनी पंडित यांच्यासाठीही एका प्रेमळ आईचा कायमचा निरोप झाला आहे.

ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका चाहत्यांच्या मनात कायम

अलीकडच्या काळात प्रेक्षकांना चांदेकर लहान पडद्यावरही पाहायला मिळाल्या. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये त्यांनी पूर्णा आजीची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील एक संस्मरणीय ठरली. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मालिकेतील कलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Tejaswini Pandit ची भावनिक पोस्ट

आईच्या निधनानंतर Tejaswini Pandit यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे – “कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे.”

Tejaswini Pandit instagram post

त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील अनेक नामवंत व्यक्तींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्योती चांदेकर यांच्या अंत्यसंस्काराची वेळही जाहीर करण्यात आली असून, अंतिम संस्कार १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील नवी पेठ वैकुंश स्मशानभूमीत पार पडतील.

हेहे पण वाचा.. ज्योती चांदेकर यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा; Amit Bhanushali ची भावनिक पोस्ट

दीर्घ आणि उल्लेखनीय कारकीर्द

ज्योती चांदेकर या मराठी चित्रपटसृष्टीतील एक मान्यवर नाव होतं. त्यांच्या कारकीर्दीकडे पाहिलं तर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात त्यांनी आपल्या मुलगी Tejaswini Pandit सोबत स्क्रीन शेअर केली होती. हा अनुभव त्या दोघींसाठीही संस्मरणीय ठरला होता.

याशिवाय त्यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा चित्रपटांत आपली वेगळी छाप सोडली. छोट्या पडद्यावर ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या होत्या.

हे पण वाचा.. “Jyoti Chandekar यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा, जुई गडकरीची भावुक पोस्ट – ‘आजी तू फसवलंस…’”

गौरवशाली कामगिरीसाठी पुरस्कार

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी ज्योती चांदेकर यांना प्रतिष्ठेचा ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचा आणि योगदानाचा सन्मान मानला जातो.

तेजस्विनी पंडितसाठी मोठं दुःख

आईच्या निधनाने Tejaswini Pandit यांच्या आयुष्यातील एक मोठा आधार हरपला आहे. नेहमी हसतमुख राहणाऱ्या आणि मनमोकळेपणाने आयुष्य जगणाऱ्या आपल्या आईच्या आठवणी आता त्यांच्यासाठी कायमस्वरूपी ठेवा बनून राहतील.

ज्योती चांदेकर या एक यशस्वी अभिनेत्री, एक प्रेमळ आई आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनविश्वात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.