मराठी चित्रपटसृष्टीतील सौंदर्य आणि अभिनय यांचा सुरेख संगम म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिने एक खास अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने अमेरिकेत राहणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावेंच्या पाहुणचाराचे भरभरून कौतुक केले आहे.
अमेरिकेत झालेल्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभाला Sonali Kulkarni हजर होती. या समारंभानंतरची पार्टी अश्विनी भवे व त्यांचे पती किशोर भवे यांनी आपल्या परदेशातील घरी आयोजित केली होती. यावेळी अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. परंतु, या प्रसंगातील विशेष ठरलेला मुद्दा म्हणजे अश्विनी भावेंनी केलेलं आत्मीय स्वागत.
Sonali Kulkarni ने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत मनापासूनची कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या पोस्टमध्ये ती म्हणते, “खुद्द अश्विनी मला म्हणाली होती – ‘तू ये ना…’ याआधी मी गेले असता आमची काहीशी चुकामुक झाली होती. पण जेव्हा कळलं की नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची सांगता समारंभाची पार्टी अश्विनी होस्ट करणार आहे, तेव्हा खूप छान वाटलं. तिथे पोहोचल्यानंतर माझा अनुभव शब्दांत सांगता येणार नाही.”
Sonali Kulkarni पुढे म्हणते, “अश्विनी आणि किशोर यांचं प्रेमळ साम्राज्य पाहून मन अभिमानानं भरून आलं. त्यांनी दिलेल्या मेजवानीनं तर पोट गच्च भरलं. किती गोड कपल आहे हे! अमेरिकेत इतकं सुंदर आणि पॅशनेट बागाईतदारपण बघायला मिळणं फारच दुर्मिळ. त्यांच्या कुटुंबातील साधेपणा, जिव्हाळा आणि पाहुण्यांशी मिसळून वागण्याची शैली पाहून मी हरखून गेले.”
हे पण वाचा.. Santosh Juvekar : “वाईट वाटतं…” ट्रोलिंगवर स्पष्ट सूर; म्हणाला, “लोक निंदा करतात, पण…”
Sonali Kulkarni इंस्टाग्राम पोस्ट..
Sonali Kulkarni च्या या पोस्टला अश्विनी भावेंनीही उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, “तुझ्याबरोबर आणि तुझ्या मैत्रिणीबरोबर ती संध्याकाळ अनुभवून खूप छान वाटलं. आमच्यासाठी तो एक आनंददायक क्षण होता.”
या खास संध्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र जमले होते. त्यात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, वैदेही परशुरामी, स्वप्नील जोशी आणि गजेंद्र अहिरे यांचा समावेश होता.
अश्विनी भावें इंस्टाग्राम पोस्ट..
अश्विनी भावेंनी आपल्या घरातील सुंदर बाग पाहुण्यांना दाखवली. परदेशात असूनही त्यांनी मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं. पाहुण्यांनी त्यांच्या मेहनतीने फुलवलेल्या शेतीची सफर केली आणि त्यानंतर झालेल्या मैफलीत अवधूत गुप्तेने रंगत आणली. या सगळ्या अनुभवामुळे ती संध्याकाळ सर्वांसाठी संस्मरणीय ठरली.
Sonali Kulkarni ने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांनाही भावल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरून अश्विनी भावेंचं कौतुक केलं. खरं तर, मराठी कलाकार परदेशात एकत्र आल्यावरही इतक्या आत्मीयतेनं, घरगुती पद्धतीनं सगळ्यांना सामावून घेणं हे फारच कौतुकास्पद आहे.
अमेरिकेत राहूनही अश्विनी भवे आणि त्यांचं कुटुंब मराठी संस्कृतीची मुळं जपून आहे, हेच या अनुभवातून स्पष्ट होतं. सोनाली कुलकर्णीसाठी हा क्षण केवळ एका पार्टीपुरता मर्यादित न राहता, तिच्या आयुष्यातील एक संस्मरणीय आठवण बनून राहिला आहे.
हे पण वाचा.. Kashmera Shah चा संताप – अर्धा तास गाडीत अडकली! मुंबईच्या वाहतूक कोंडीवर सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी









